लग्नसोहळ्यात आत्मघाती बॉम्बस्फोट; 40 जणांचा जागीच मृत्यू!

काबूल | अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबुलमध्ये एका लग्नसोहळ्यादरम्यान मोठा बॉम्बस्फोट घडवण्यात आला आहे. या घटनेत 40 जणांचा मृत्यू झाला असून 100 लोक जखमी असल्याची माहिती समोर आली आहे.

काबूलमधील पश्चिमेकडील दुबई शहरातील एका लग्न समारंभामधील ही घटना आहे. शनिवारी रात्री उशिरा हा बॉम्बस्फोट घडवण्यात आल्याचं समजतंय. पाहुण्यामंडळींनी भरलेल्या रिसेप्शनमध्ये हॉलमध्ये हा आत्मघाती बॉम्बस्फोट घडला आहे.

स्थानिक अधिकाऱ्यांनी अधिकृतरित्या मृतांचा आकडा अद्याप जारी केलेला नाही. मात्र या स्फोटात 30 हून अधिक लोक मृत्युमुखी पडल्याचं गृह मंत्रालयाचे प्रवक्ते नुसरत रहिमी यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, अफगाणिस्तानमध्ये स्फोट होण्याची एकाच महिन्यातली ही दुसरी घटना आहे. यापूर्वी 8 ऑगस्ट रोजीही मोठा स्फोट झाला होता.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-आता बाण हातात आहे; घड्याळ तर बंद पडलं- जयदत्त क्षीरसागर

-रावसाहेब दानवेंचा मोठा गौप्यस्फोट; म्हणतात…

-गुलाम अहमद मीर यांची नजरकैद बेकायदेशीर-पी. चिदंबरम

-पूरस्थितीनंतरच्या मागण्यांसाठी विश्वजित मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; बाळासाहेबांची मात्र दिल्लीवारी!

Loading...