धक्कादायक! सुधीर मुनगंटीवारांच्या चंद्रपुरात अ‌ॅम्बुलन्समधून अवैध दारूची वाहतूक….

चंद्रपूर |  मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या 4 वर्षापासून दारूबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र 108 नंबरच्या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून अवैध दारु तस्करी होत असल्याची धक्कादायक घटना चंद्रपुरात उघडकीस आली आहे.

चंद्रपुरातील रामनगर पोलिसांनी बाबुपेठ भागातून रुग्णवाहिकेतून 6 लाख रुपयांची दारू जप्त केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. चंद्रपुरात खरंच दारूबंदी झाली आहे का? असा प्रश्न आता लोक विचारत आहेत.

यवतमाळच्या राहुल वानखेडे नावाच्या चालकाला याप्रकरणी अटक केली असून एकूण 16 लाख 85 हजाराचा मुद्देमाल या प्रकरणी जप्त करण्यात आला आहे.

दरम्यान, सरकारी अ‌ॅम्बुलन्समधूनच जर दारूची वाहतूक होत असेल तर नागरिकांनी यंत्रणेवर विश्वास तरी कसा ठेवायचा? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-ही अभिनेत्री म्हणते… सलमान खान माझ्याशी लग्न करणार आहे!

-शरद पवार म्हणतात… कावळ्यांची चिंता करायची नाही तर मावळ्यांची चिंता करावी!

-पूरपरिस्थिती ओसरल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा उद्यापासून पुन्हा सुरू

-“महाराष्ट्राची उपराजधानी असलेलं नागपूर गुन्हेगारीचं केंद्र अन् मुख्यमंत्रीदेखील त्याच गावचे”

-लोकसभा निवडणुकांआधी काँग्रेसवासी झालेल्या शत्रुघ्न सिन्हांचा सूर बदलला; म्हणतात…

Loading...