अरूण जेटलींची प्रकृती चिंताजनक; महत्वाचे नेते एम्समध्ये दाखल

नवी दिल्ली |  माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांची प्रकृती अतिशय चिंताजनक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जेटलींना भेटण्यासाठी एम्स रुग्णालयात जाण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर भाजपाध्यक्ष अमित शहा देखील जाणार असल्याचं कळतंय. जेटलींना 9 ऑगस्ट रोजी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर अनेक राजकीय नेते त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यास जात आहेत.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंग संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास एम्समध्ये पोहोचले आहेत. पंतप्रधान मोदी हे २ दिवसांच्या भूतान दौऱ्यावरुन नुकतेच भारतात परतले आहेत. त्यामुळे शनिवारी (आज) रात्री ते एम्समध्ये जाऊन जेटलींच्या तब्येतीची विचारपूस करतील.

दरम्यान, जेटलींना 9 ऑगस्ट रोजी श्वासनाचा त्रास होऊ लागल्याने एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-उद्यापासून युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंचा पूरग्रस्त भागाचा दौरा!

-गोपीचंद पडळकर ‘या’ मतदारसंघातून विधानसभा लढणार???

-समाजसुधारक म्हणून पंतप्रधान मोदी ओळखले जातील- अमित शहा

-पंडित नेहरूंमुळेच गोवा मुक्तीस उशीर झाला; भाजपच्या शिवराज सिंह चौहान यांची टीका

-….तर एक दिवस भाजपचं काँग्रेस होईल- महादेव जानकर

Loading...