होय, मला प्रकाश आंबेडकरांचा फोन आला होता; बाळा नांदगावकरांची कुबली

मुंबई | मनसे अध्यक्ष  राज ठाकरे यांना कोहिनूर प्रकरणी ईडीची नोटीस बजावण्यात आली आहे. यानंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषदेत घेतली आहे. त्यांनी आज या पत्रकार परिषदेत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

होय…  मला प्रकाश आंबेडकर यांचा दहा दिवसांपूर्वी कॉल आला होता. आणि त्यांनी सांगितलं होतं की राज यांच्या नोटीसवर सही झाली आहे, असं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं.

राज ठाकरेंना ईडीची नोटीस येणार आहे. त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करा असं मी बाळा नांदगावकर यांना 10 दिवसांपूर्वीच सांगितलं होतं. त्यांनी तो प्रयत्न केला की नाही ते मला माहित नाही, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला होता.

दरम्यान, 22 तारखेला शांततेत ईडी कार्यालयात जाणार असल्याचं नांदगावकर यांनी सांगितलं आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-“आतापर्यंत मनसेचं खळखट्ट्याक पाहिलं… आता शांततेची ताकद दाखवू”

-ईडीच्या नोटीसनंतर मनसेची पत्रकार परिषद; म्हणाले…

-10 दिवसांपूर्वीच सांगितलं होतं, राज ठाकरेंना वाचवा- प्रकाश आंबेडकर

-भाजपच्या खटारा गाडीत अनेक जण कोंबले जात आहेत- धनंजय मुंडे

-आयसिसचे पाच दहशतवादी भारतात; देशभरात हायअलर्ट जारी!

Loading...