“खळखट्ट्याक पाहिलं… आता मनसेच्या शांततेची ताकद दाखवू”

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने नोटीस बजावल्यानंतर अधिक माहिती देण्यासाठी मनसेने आज पत्रकार परिषद आयोजित केली होती. आतापर्यंत मनसेचं खळखट्ट्याक पाहिलं… आता शांततेची ताकद दाखवू, असं म्हणत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन केलं केलं.

राज ठाकरेंना ईडीने 22 तारखेला साडे अकराच्या सुमारास बोलावलं आहे. त्या दिवशी मनसेचे कार्यकर्ते शांततेत ईडी कार्यालयाबाहेर जमा होतील, असं ते म्हणाले.

मनसेच्या आंदोलनाचा कोणालाही त्रास होणार नाही. कामगार, व्यापारी किंवा कोणालाही त्रास न देता सर्व काही शांततेत होईल, असंही त्यांनी सांगितलं.

आम्हाला पूर्ण कल्पना आहे की कार्यकर्ते पक्षाच्या आदेशाच्या बाहेर जाणार नाहीत. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना कंट्रोल करु. पक्षाची भूमिका कार्यकर्त्यांना मान असेलच, पोलिसांनीही आम्हाला सहकार्य करावं. अतातायीपणा करु नये, असंही ते म्हणाले.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-ईडीच्या नोटीसनंतर मनसेची पत्रकार परिषद; म्हणाले…

-10 दिवसांपूर्वीच सांगितलं होतं, राज ठाकरेंना वाचवा- प्रकाश आंबेडकर

-भाजपच्या खटारा गाडीत अनेक जण कोंबले जात आहेत- धनंजय मुंडे

-आयसिसचे पाच दहशतवादी भारतात; देशभरात हायअलर्ट जारी!

-पर्वती विधानसभा मतदारसंघातून माधुरी मिसाळ यांचा पत्ता कट???

Loading...