धक्कादायक!!! ‘बीव्हीजी’च्या हणमंतराव गायकवाडांना करोडोंचा गंडा

मुंबई | बीव्हीजी ग्रुपचे सर्वेसर्वा हणमंतराव गायकवाडांची 16 कोटी 45 लाख रुपयांना फसवणूक करण्यात आली आहे. मार्च 2011 मध्ये बीव्हीजी प्रीमिअर प्लाझा हाऊस जुना मुंबई-पुणे रोड येथे हा प्रकार घडला आहे.

विनोद रामचंद्र जाधव आणि सुवर्णा विनोद जाधव या पती-पत्नीविरोधात याप्रकरणी चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जाधव दाम्पत्याच्या तिन्ही कंपन्यांमध्ये गायकवाडांनी 16 कोटी 45 लाख रुपयांची गुंतवणूक केली. मात्र त्यांची फसवणूक झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, जाधव दाम्पत्याने हणमंतराव गायकवाड यांना एका कंपनीच्या संचालकपदी नियुक्त केलं होतं, मात्र कंपनीच्या आर्थिक व्यवहारांपासून त्यांना अलिप्त ठेवण्यात आल्याने त्यांनी काही दिवसांपूर्वीच आपला राजीनामा दिला होता.

Loading...

महत्त्वाच्या बातम्या-

-मला क्रमांक 2 चा नेता म्हणू नका- गिरीश महाजन

-“मी टोपी टाकली अन् ती विश्वजीत कदमांना बसली”

-भारतीय संघाचं नेतृत्व कोहलीकडेच राहणार का? बीसीसीआयनं दिलं ‘हे’ उत्तर

-“संधीसाधू लोक पक्ष सोडून गेले असले तरी काँग्रेसला काही फरक पडणार नाही”

-“जनतेचे सुखाचे दिवस हिरावून घेणाऱ्या भाजपला सत्तेवर येऊ देणार नाही”

Loading...