मुंबईतील सर्व जागा युतीच जिंकणार- देवेंद्र फडणवीस

मुंबई | येत्या विधानसभेला मुंबईतील सर्व जागा युतीच जिंकणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी शुक्रवारी दुपारी भाजप अध्यक्षपदाची सूत्रे अध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडून स्वीकारली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

गेली विधानसभा निवडणूक आम्ही स्वतंत्र लढलो होतो. मात्र आता भाजप आणि शिवसेना या दोन्ही टीम एकत्र आल्या आहेत. यामुळे सर्व जागांवर युतीचाच विजय होईल, असं देेवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

विधानसभेच्या मुंबईतील सर्वच्या सर्व जागा जिंकण्याचं आपलं लक्ष्य आहे. त्यासाठी दिवस कमी उरले आहेत. पण कार्यकर्त्यांच्या ताकदीवर हे लक्ष्य आपण पूर्ण करून दाखवू, असा विश्वास मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

Loading...

महत्त्वाच्या बातम्या-

-वडिलांचं छत्र हरपलेल्या शेतकरीकन्येचा शिक्षणखर्च रोहित पवारांनी उचलला

-पॉर्न बघत असाल तर सावधान; समोर आलीय अत्यंत धक्कादायक माहिती

-धक्कादायक!!! ‘बीव्हीजी’च्या हणमंतराव गायकवाडांना करोडोंचा गंडा

-मला क्रमांक 2 चा नेता म्हणू नका- गिरीश महाजन

-“मी टोपी टाकली अन् ती विश्वजीत कदमांना बसली”

Loading...