“भाजपच्या खटारा गाडीत अनेक जण कोंबले जात आहेत”

औरंगाबाद | भाजपच्या खटारा गाडीत अनेक जण कोंबले जात आहे. महाराष्ट्र काँग्रेस-राष्ट्रवादी मुक्त करण्याची भाषा करणारं भाजप स्वत:च राष्ट्रवादी युक्त होऊन बसलं आहे, असा टोला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लगावला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रे दरम्यान औरंगाबादमध्ये धनंजय मुंडे बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे लाव रे तो व्हीडिओ म्हणायचे तेव्हा भल्याभल्यांची टरकायची. त्यामुळे राज ठाकरे यांना ईडीची नोटीस बजावली, असं धनंजय मुंडे म्हणाले आहेत.

दरम्यान, भाजपविरोधात आवाज केला तर आवाज दाबला जातोय. त्यामुळे माझ्यासारखा सर्वसामान्याला देशात लोकशाही जिवंत आहे की नाही, असा प्रश्न पडच असल्याचं धनंजय मुंडे म्हणाले आहेत.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

आयसिसचे पाच दहशतवादी भारतात; देशभरात हायअलर्ट जारी!

-पर्वती विधानसभा मतदारसंघातून माधुरी मिसाळ यांचा पत्ता कट???

-नाना पाटेकर अमित शहांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

-“पवारसाहेब, जे कावळे उडाले त्यांना इतरांच्या पिंजऱ्यातून पळवणारे कोण?”

Loading...