विधानसभा लढण्यावर एकनाथ खडसे म्हणतात…

जळगाव | पक्ष जो निर्णय घेईल तो घेईल मात्र मुक्ताईनगरमधून विधानसभा निवडणूक लढण्यासाठी मी इच्छुक आहे, असं भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. भाजपच्या शक्ती केंद्र प्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते.

भाजपकडून विधानसभेसाठी एकनाथ खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे-खेवलकर यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र असं असलं तरी मी पक्षाकडे उमेदवारीची मागणी करणार आहे, असं एकनाथ खडसेंनी यावेळी सांगितलं.

भाजपमध्ये येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांची पक्ष निष्ठा तपासल्यास निष्ठावंतावर अन्याय होणार नाही. पक्षात येणाऱ्यांची निष्ठा तपासली पाहिजे, असंही ते यावेळी म्हणाले.

दरम्यान, भाजप सत्तेत आल्यापासून एकनाथ खडसेंवर अन्याय होतोय, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सातत्याने होत असतात. आता आगामी निवडणुकीत मुक्ताई विधानसभा मतदारसंघात भाजप कोणाला तिकीट देणार?? हे येत्या काळात स्पष्ट होईल.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-‘आमचं ठरलंय… जय महाराष्ट्र!’; रश्मी बागल शिवसेनेत प्रवेश करणार??

-…म्हणून महाराष्ट्र युवक काँग्रेस भरवणार टिकटॉक स्पर्धा!

-प्रशिक्षकपदी पुन्हा एकदा निवड झाल्यानंतर रवी शास्त्री म्हणतात…

-महाराष्ट्रातील वृक्षलागवड हे तर थोतांड आणि नाटक आहे; सयाजी शिंदेंचा सरकारवर हल्लाबोल

-अनुष्कासोबतच्या नात्याबाबत प्रभासनं मौन सोडलं; म्हणतो…

Loading...