भाजपचे जेष्ठ नेते अरूण जेटली उपचार घेत असलेल्या एम्स रूग्णालयात भीषण आग

नवी दिल्ली |  दिल्लीतील सुप्रसिद्ध एम्स हॉस्पिटलमध्ये भीषण आग लागली आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचं बोललं जातंय. हाती आलेल्या माहितीनुसार ही आग पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर लागल्याची माहिती आहे. भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री अरूण जेटली एम्स रूग्णालयात उपचार घेत आहेत.

एम्सच्या टिचिंग ब्लॉकमध्ये ही आग लागली असून अग्निशमन दलाच्या 22 गाड्यांकडून आग विझवली जात आहे. चार मजले रिकामे करण्यात आले असून आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

आगीनंतर एम्स रूग्णालयातला आप्तकालीन विभाग तातडीने बंद करण्यात आला आहे.

दरम्यान, एम्समध्ये दररोज व्हीआयपींची येजा असते. जेटली उपचार घेत असल्यामुळे सध्या वरिष्ठ नेत्यांची वर्दळ आहे. त्यामुळे एम्सपुढे मोठं आव्हान निर्माण झालंय.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-‘आमचं ठरलंय… जय महाराष्ट्र!’; रश्मी बागल शिवसेनेत प्रवेश करणार??

-…म्हणून महाराष्ट्र युवक काँग्रेस भरवणार टिकटॉक स्पर्धा!

-प्रशिक्षकपदी पुन्हा एकदा निवड झाल्यानंतर रवी शास्त्री म्हणतात…

-महाराष्ट्रातील वृक्षलागवड हे तर थोतांड आणि नाटक आहे; सयाजी शिंदेंचा सरकारवर हल्लाबोल

-अनुष्कासोबतच्या नात्याबाबत प्रभासनं मौन सोडलं; म्हणतो…

 

Loading...