मला क्रमांक 2 चा नेता म्हणू नका- गिरीश महाजन

जळगाव | जळगावमध्ये नियोजन समितीच्या बैठकीत अभिनंदनाचा ठराव मांडताना महाजनांचा उल्लेख राज्यातले क्रमांक 2 चे मंत्री म्हणून करण्यात आला. त्यावेळी मला क्रमांक 2 चा नेता म्हणू नका किंवा दुसरा कोणताच क्रमांक लावू नका, असं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं.

गिरीश महाजन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून निवड झाल्यावर त्यांच्या अध्यक्षतेखाली ही पहिलीच बैठक होती.

भाजपचे आणि मुख्यमंत्र्यांचे ‘संकटमोचक’ म्हणून महाजनांची ओळख आहे. पक्षावर आलेलं संकट ते सराईतपणे दूर सारतात, अशी त्यांची ख्याती आहे. भाजपत होणारे बरेच पक्षप्रवेश महाजनांच्या कृपाशीर्वादाने होतात अश्या चर्चा घडत असतात.

जळगाव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत एकनाथ खडसेंसोबतच भाजपचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. त्यावेळी बोलताना मला कुठलाही क्रमांक लावू नका, असं महाजन म्हणाले.

Loading...

महत्त्वाच्या बातम्या-

-“मी टोपी टाकली अन् ती विश्वजीत कदमांना बसली”

-भारतीय संघाचं नेतृत्व कोहलीकडेच राहणार का? बीसीसीआयनं दिलं ‘हे’ उत्तर

-“संधीसाधू लोक पक्ष सोडून गेले असले तरी काँग्रेसला काही फरक पडणार नाही”

-“जनतेचे सुखाचे दिवस हिरावून घेणाऱ्या भाजपला सत्तेवर येऊ देणार नाही”

-ज्या पद्धतीने अमेठी जिंकली तसंच बारामतीही जिंकू- चंद्रकांत पाटील

Loading...