राज ठाकरेंना गिरीश महाजन म्हणतात… तर घाबरु नका!

मुंबई |  मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे पुत्र उन्मेष जोशी यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. यावरून चांगलंच राजकारण तापायला सुरूवात झाली आहे. तुमची चूक नसेल आणि नोटीशीत काही तथ्य नसेल तर घाबरू नका, असा सल्ला मंत्री गिरीश महाजन यांनी राज यांना दिला आहे.

राज ठाकरे यांनी EVM वरील आंदोलनाचा इशारा दिला म्हणूनच त्यांना ईडीने नोटीस पाठवल्याचा आरोप होत आहे. यावर या गोष्टीत अजिबात तथ्य नाही, असं गिरीश महाजन म्हणाले.

दुसरीकडे मंत्री विनोद तावडे यांनी देखील राज यांना प्रेमाचा सल्ला दिला आहे. तुम्ही जर चुकला नसाल तर घाबरून जाण्याची गरज नाही. निवांत रहा आणि बिनधास्तपणे चौकशीला सामारे जा, असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी मात्र आक्रमक भूमिका घेत राज ठाकरे चुकले नसतील तर कारवाई होणार नाही मात्र चुकले असतील तर त्यांना भोगावे लागेल, असं म्हटलं आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-पूरग्रस्तांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी महेश लांडगेंनी घेतला स्तुत्य निर्णय

-तिकीट नाकारलेल्या किरीट सोमय्यांकडे भाजपने सोपावली ही जबाबदारी!

-छोट्या दानवेंकडे भाजपने सोपवली ही मोठी जबाबदारी!

-मनसे नेते अनिल शिदोरेंचा फडणवीस सरकारवर गंभीर आरोप, म्हणतात..

-“देवांचा राजा इंद्र; महाराष्ट्राचा राजा देवेंद्र”

Loading...