हिमाची ‘सुवर्ण धाव’; एकाच महिन्यात पटकवली 5 सुवर्ण पदकं

नवी दिल्ली | भारताची स्टार धावपटू हिमा दास हिने चेक रिपब्लिक येथील ‘मेटूजी ग्रँड प्रिक्स अ‌ॅथलेटिक्स’ स्पर्धेत महिलांच्या 400 मीटर शर्यतीत सुवर्ण पदक पटकावले आहे. हिमाने 400 मीटर अंतर 52.9 सेकंदात पार केलं आहे.

गेल्या 19 दिवसात हिमाचे हे पाचवं सुवर्ण पदक असून एकाच महिन्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर तब्बल 5 सुवर्ण पदकं पटकवण्याचा विक्रम हिमानं केला आहे.

हिमाने या आधीही 2 जुलैला युरोपमध्ये, 7 जुलैला कुंठो अ‌ॅथलेटिक्समध्ये, 13 जुलैला चेक गणराज्यात तर 17 जुलैला टाबोर ग्रँड प्रिक्समध्ये अशा वेगवेगळ्या स्पर्धेत सुवर्ण पदकं मिळवलं आहे.

हिमा दासचं सर्व क्षेत्रातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. तसेचं तिचा देशाला अभिमान आहे, असंही सांगण्यात येत आहे.

Loading...

दरम्यान, याच मेटूजी ग्रँड प्रिक्स अ‌ॅथलेटिक्स स्पर्धेत भारताची व्ही.के विस्मया हिने दुसरे स्थान पटकावले आहे. तिने हे अंतर 52.48 सेकंदात पार केलं.

महत्त्वाच्या बातम्या-

-जे.पी. नड्डा यांचा पहिलाच मुंबई दौरा, पण टाळली उद्धव ठाकरेंची भेट

-लोकप्रतिनिधींबद्दल गैरसमज पसरवणं थांबवा; ‘दादां’चा ‘दादां’ना सल्ला

-बंदूूक घेऊन नाचणाऱ्या भाजप आमदाराला बिग बॉसचं निमंत्रण!

-खासदार अमोल कोल्हेंचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणतात…

-शिला दीक्षित यांचं जाणं उद्ध्वस्त करणारं; राहुल गांधींना शोक अनावर

Loading...