इम्रान खान पहिल्यांदाच अमेरिका दौऱ्यावर गेले अन् स्वागताला कुणीच नाही आले…!

वाॅशिंग्टन | इम्रान खान पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून पहिल्यांदाच अमेरिका दौऱ्यावर गेले आहेत. मात्र तिथं त्यांच्या स्वागताला प्रशासनातला एकही मोठा नेता आला नाही, यावरून त्यांची ट्विटरवर खिल्ली उडवली जात आहे.

सर्वसामान्य नागरिकाप्रमाणे त्यांनी कतार एअरवेजमधून प्रवास केला. विमानातून उतरल्यानंतर अमेरिकेत राहणाऱ्या काही पाकिस्तानी नागरिकांनी त्यांच स्वागत केलं, मात्र प्रशासनाकडून कुणीही उपस्थित नसल्यानं सोशल मीडियावर या प्रकरणाची भलतीच चर्चा होतेय.

तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यात इम्रान खान पाकिस्तानचे राजदूत असद मजीद खान यांंच्या शासकीय निवासस्थानात राहतील. या दौऱ्यात ते अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भेटून संरक्षण, व्यापार, कर्जाच्या मुद्द्यावर चर्चा करणार आहे.

दरम्यान, इम्रान खान यांनी त्यांच्या देशाचा पैसा वाचवला आहे. ते इतर नेत्यांसारखं अहंकार घेऊन कुठे जात नाहीत, असं म्हणत काश्मिरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांनी त्यांची पाठराखण केली आहे.

Loading...

महत्त्वाच्या बातम्या-

-अखेर कलबुर्गींच्या मारेकऱ्यांची ओळख पटली

-हिमाची ‘सुवर्ण धाव’; एकाच महिन्यात पटकवली 5 सुवर्ण पदकं

-जे.पी. नड्डा यांचा पहिलाच मुंबई दौरा, पण टाळली उद्धव ठाकरेंची भेट

-लोकप्रतिनिधींबद्दल गैरसमज पसरवणं थांबवा; ‘दादां’चा ‘दादां’ना सल्ला

-बंदूूक घेऊन नाचणाऱ्या भाजप आमदाराला बिग बॉसचं निमंत्रण!

Loading...