आयसिसचे ५ दहशतवादी भारतात घुसले; देशभरात हायअलर्ट

नवी दिल्ली | आयसिस या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचे पाच दहशतवादी भारतात घुसल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. ही माहिती मिळाल्यानंतर नवी दिल्ली, मुबंई, गुजरात यासह संपूर्ण देशभरात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

भारतात घुसलेले पाच दहशतवादी पाकिस्तानच्या एजेंटसोबत घुसल्याची माहिती राजस्थानचे पोलीस अधीक्षक कल्याणमल मीणा यांनी दिली आहे. याबाबत राजस्थानच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत खबरदारी बाळगण्याचा इशारा देण्यात आला आहे.

पाच दहशतवादी अफगाणिस्तान पासपोर्टच्या मदतीने भारतात घुसले असल्याची माहिती मिळत आहे. भारतात घुसलेले पाचही दहशतवादी आतंकवादी हल्ला करण्यासाठी संधीच्या शोधात असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, गुप्तचर यंत्रणेच्या या माहितीनंतर पोलीस आणि सुरक्षा जवानांनी सर्वत्र सावधानतेचा इशारा दिला आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-पर्वती विधानसभा मतदारसंघातून माधुरी मिसाळ यांचा पत्ता कट???

-नाना पाटेकर अमित शहांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

-“पवारसाहेब, जे कावळे उडाले त्यांना इतरांच्या पिंजऱ्यातून पळवणारे कोण?”

-महाजनला जोड्यानं हाणलं पाहिजे; गिरीश महाजनांवर टीका करताना धनंजय मुंडेंची जीभ घसरली

Loading...