आता बाण हातात आहे; घड्याळ तर बंद पडलं- जयदत्त क्षीरसागर

बीड | लोकसभेप्रमाणे विधानसभेला तितक्याच ताकदीने उभं राहून परिवर्तनासाठी साथ द्या. पुढच्या पिढीचे भविष्य घडवायचे असेल तर विकास कामं करणं गरजेची आहेत. यासाठी आता हातात बाण असून घड्याळ बंद पडलं आहे, असं शिवसेनेचे नेते जयदत्त क्षीरसागर यांनी म्हटलं आहे.

विरोधकांनी दुसऱ्यांच्या उट्या काढण्यापेक्षा विकास कामं करून दाखवावीत. आम्ही कुणाच्या उखाळ्या पाखाळ्या काढत बसणारे नाही तर विकासासाठी लढणारे आहोत, असं म्हणत जयदत्त क्षिरसारगर यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

आम्ही बिघडलेलं घड्याळ काढून धनुष्य हाती घेतलं आहे. बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक आणि माझे सहकारी माझ्या बरोबर असल्याने लोकसभेपेक्षाही विधानसभेला अधिक मतदान होईल, असा विश्वास क्षीरसागर यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, तुम्ही खंबीरपणे साथ द्या. मला राज्यात फिरावं लागणार आहे. मी तुमचा शब्द अंतिम मानून निश्चिंत राहणार आहे, असं जयदत्त क्षिरसागर यांनी म्हटलं आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-रावसाहेब दानवेंचा मोठा गौप्यस्फोट; म्हणतात…

-गुलाम अहमद मीर यांची नजरकैद बेकायदेशीर-पी. चिदंबरम

-पूरस्थितीनंतरच्या मागण्यांसाठी विश्वजित मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; बाळासाहेबांची मात्र दिल्लीवारी!

-“आम्ही आमदार शोधतो आणि तेजस पाली शोधतोय”- आदित्य ठाकरे

Loading...