“जेएनयू विद्यापीठाला मोदींचं नाव द्या, मोदींच्या नावावरही काहीतरी असावं”

नवी दिल्ली | दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाला (जेएनयू) पंतप्रधान नरेंद्र मोदी याचं नाव देण्यात यावं, अशी मागणी भाजप खासदार हंसराज हंस यांनी केली आहे. ते रविवारी जेएनयू विद्यापीठात एका कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी त्यांनी कलम 370 रद्द झाल्याच्या मुद्यावरही भाष्य केलं.

सर्वजण शांततेत राहावेत, एवढीच प्रार्थना करा. गोळीबार आणि बॉम्बफेक होऊ नये, या मताचा मी आहे. आपल्या पूर्वजांनी काही चुका केल्या. त्याचे परिणाम आज आपण भोगत आहोत, असं हंसराज हंस यांनी म्हटलं आहे.

हंसराज यांनी जेएनयूमधील ‘जे’ या आद्याक्षराचा अर्थ उपस्थितांना विचारला. तेव्हा सगळ्यांनी एका सुरात ‘जवाहरलाल’ असं उत्तर दिलं. यावर हंसराज हंस यांनी त्यांच्यामुळेच 370 चा घोळ निर्माण झाल्याचं म्हणत नेहरूंवर टीका केली आहे.

दरम्यान, नेहरूंचा घोळ मोदींनी आता निस्तरला आहे. त्यामुळे मोदींच्या नावावरही काहीतरी असायला पाहिजे, असं हंसराज हंस यांनी म्हटलं आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-राधाकृष्ण विखे पाटील यांना मातृशोक; सिंधुताई विखेंचं वृद्धापकाळाने निधन

-लग्नसोहळ्यात आत्मघाती बॉम्बस्फोट; 40 जणांचा जागीच मृत्यू

-आता बाण हातात आहे; घड्याळ तर बंद पडलं- जयदत्त क्षीरसागर

-रावसाहेब दानवेंचा मोठा गौप्यस्फोट; म्हणतात…

Loading...