अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

नवी दिल्ली | जंतरमंतरवरील अण्णा हजारेंच्या आंदोलनापासून केजरीवाल यांच्यासोबत जोडले गेलेले आणि आम आदमी पक्षाचे संस्थापक सदस्यांपैकी एक असलेले माजी आमदार कपिल मिश्रा यांनी आज अरविंद केजरीवाल यांची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला.

लोकसभा निवडणुकीत सातही मतदारसंघात मी भाजपचाच प्रचार केला होता. आणि विधानसभा निवडणुकीतही मी तेच करेन, असं कपिल मिश्रा आपल्या भाजप प्रवेशावेळी म्हणाले.

माझी आई भाजपची जुनी सदस्य आहे. मीही भाजपसोबत काम करावं अशी तिची इच्छा होती. ती आज पूर्ण झाली. आता मी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत ’60 सीटे मोदी को’ ही मोहीम राबवणार आहे, त्यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, ‘खिलते कमल से आशा हैं बाकी सब तमाशा हैं’, असं ट्वीट केलं आहे. त्यांच्या भाजप प्रवेशाने दिल्लीच्या राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Loading...

कपिल मिश्रा यांचं ट्विट-

 

महत्वाच्या बातम्या-

-विधानसभा लढण्यावर एकनाथ खडसे म्हणतात…

-‘आमचं ठरलंय… जय महाराष्ट्र!’; रश्मी बागल शिवसेनेत प्रवेश करणार??

-…म्हणून महाराष्ट्र युवक काँग्रेस भरवणार टिकटॉक स्पर्धा!

-प्रशिक्षकपदी पुन्हा एकदा निवड झाल्यानंतर रवी शास्त्री म्हणतात…

-महाराष्ट्रातील वृक्षलागवड हे तर थोतांड आणि नाटक आहे; सयाजी शिंदेंचा सरकारवर हल्लाबोल

Loading...