लोकसभेला तिकीट नाही, मात्र आता सोमय्यांकडे भाजपने दिली ही जबाबदारी!

मुंबई | भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांची भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सोमय्या यांच्याबरोबर डॉ. सुभाष भामरे, प्रविण पोटे पाटील, योगेश गोगावले, अशोक कांडलकर यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

लोकसभेला किरीट सोमय्या यांना पक्षाकडून तिकीट नाकारण्यात आलं होतं. त्यानंतर सोमय्या पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा होत्या. मात्र प्रदेश उपाध्यक्षपद देऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात आला आहे.

चंद्रकांत पाटील प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर आज(सोमवार) काही संघटनात्मक बदल करण्यात आले आहेत. मुख्य प्रवक्तेपदी माधव भांडारी तर सहमुख्य प्रवक्तेपदी केशव उपाध्येंची नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान, पुणे शहराध्यक्षपदाची जबाबदारी माधुरी मिसाळ यांच्याकडे देण्यात आली आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-छोट्या दानवेंकडे भाजपने सोपवली ही मोठी जबाबदारी!

-मनसे नेते अनिल शिदोरेंचा फडणवीस सरकारवर गंभीर आरोप, म्हणतात..

-“देवांचा राजा इंद्र; महाराष्ट्राचा राजा देवेंद्र”

-‘आघाडी-बिघाडी’ बंद करा; राष्ट्रवादीच्या नेत्यांचं पोलीस आयुक्तांना निवेदन

-चूक नसेल तर घाबरण्याचं कारण नाही… मात्र चूक नसेल तर भोगावं लागेल- देवेंद्र फडणवीस

Loading...