पर्वती विधानसभा मतदारसंघातून आमदार माधुरी मिसाळ यांचा पत्ता कट???

पुणे | पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांची भाजपने पुणे शहराध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. त्यांच्या या नियुक्तीसह शहर भाजपमध्ये जोरदार चर्चांना उधाण आलं आहे. विधानसभा निवडणुकीतून मिसाळ यांचा पत्ता कट झाला की काय? अशी चर्चा या निमित्ताने सुरु झाली आहे.

माधुरी मिसाळ पर्वती मतदारसंघातून २००९ पासून आमदार आहेत. त्याआधी त्या मंडई वॉडमधून नगरसेविका होत्या. मात्र त्यांना शहराध्यक्षपदी बसवल्याने पक्षात वेगळं काही शिजत आहे का?, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

भाजप हा पक्ष आपल्या शिस्तीसाठी ओळखला जातो, मात्र विशेष बाब म्हणजे याच भाजपमध्ये निवड प्रक्रिया डावलून माधुरी मिसाळ यांना शहराध्यक्षपदी बसवण्यात आलं आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यासंदर्भात निर्णय घेतला.

दरम्यान, स्वीकृत नगरसेवक गणेश बीडकर यांना शहर चिटणीस करण्यात आलंय. पाटलांच्या जवळचे असल्यानं त्यांचं राजकीय पुनवर्सन करण्यात आल्याचं बोललं जातंय.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-नाना पाटेकर अमित शहांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

-“पवारसाहेब, जे कावळे उडाले त्यांना इतरांच्या पिंजऱ्यातून पळवणारे कोण?”

-महाजनला जोड्यानं हाणलं पाहिजे; गिरीश महाजनांवर टीका करताना धनंजय मुंडेंची जीभ घसरली

-राष्ट्रवादीला मोठा धक्का; या नेत्या करणार शिवसेनेत प्रवेश!

Loading...