अभिनेते नाना पाटेकर अमित शहांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

नवी दिल्ली | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहां यांची त्यांच्या नॉर्थ ब्लॉकमधील कार्यालयात भेट घेतली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या असून या भेटीबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.

नाना पाटेकर यांनी केंद्रीय गृहमंत्रालयात जाऊन अमित शहांची भेट घेतली आहे. यानंतर आता नाना पाटेकर राजकारणात एंट्री करणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

अभिनयासोबतच नाना पाटेकर ‘नाम’ संस्थेच्या माध्यमातून समाजसेवा करत आहेत. मात्र अमित शहांची भेट घेतल्याने नाना आता राजकीय क्षेत्रात येणार असल्याचं बोललं जात.

दरम्यान, नाना पाटेकर आणि अमित शहांच्या भेटी मागचं कारण अद्यापही कळू शकलेलं नाही. मात्र या भेटीनंतर नाना पाटेकर भाजपमध्ये प्रवेश करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-“पवारसाहेब, जे कावळे उडाले त्यांना इतरांच्या पिंजऱ्यातून पळवणारे कोण?”

-महाजनला जोड्यानं हाणलं पाहिजे; गिरीश महाजनांवर टीका करताना धनंजय मुंडेंची जीभ घसरली

-राष्ट्रवादीला मोठा धक्का; या नेत्या करणार शिवसेनेत प्रवेश!

-पत्रास कारण की…; राज्यमंत्री रविंद्र वायकर यांचं थेट पंतप्रधानांना पत्र

Loading...