पूरपरिस्थिती ओसरल्यानंतर राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा पुन्हा सुरू

मुंबई | महाराष्ट्रात पुरपरिस्थितीमुळे स्थगित करण्यात आलेली राष्ट्रवादी काँग्रेसची ‘शिवस्वराज्य यात्रा’ संत एकनाथ महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेवून उद्या म्हणजेच १९ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची ६ ऑगस्टला सुरु झालेली शिवस्वराज्य यात्रा नाशिक जिल्हयात बागलाण येथे स्थगित करण्यात आली होती.

राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार अमोल कोल्हे यांच्यासह राष्ट्रवादीचे महत्वाचे नेते उद्या सुरू होणाऱ्या यात्रेत आपला सहभाग नोंदवतील.

सोमवारी पैठण येथे सकाळी 11 वाजता बाळानगर, दुपारी 2 वाजता बदनापूर तर सायंकाळी 5 वाजता भोकरदन येथे यात्रेनिमित्त जाहीर सभा होणार आहे.

१९ ते २६ ऑगस्टपर्यंत ही शिवस्वराज्य यात्रा असणार आहे.यापुढील यात्रेच्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी दिली आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-“महाराष्ट्राची उपराजधानी असलेलं नागपूर गुन्हेगारीचं केंद्र अन् मुख्यमंत्रीदेखील त्याच गावचे”

-लोकसभा निवडणुकांआधी काँग्रेसवासी झालेल्या शत्रुघ्न सिन्हांचा सूर बदलला; म्हणतात…

-भाजपकडे विधानसभेसाठी मी 57 जागा मागितल्या आहेत- महादेव जानकर

-“मोहन भागवतांना जेलमध्ये टाकतो; फक्त माझ्या हातात सत्ता द्या”

-जितेंद्र आव्हाड यांची राहुल गांधींना ‘ही’ कळकळीची विनंती…

Loading...