राज ईडी-बीडीला भीक घालत नाहीत. आमचा त्यांना पाठिंबा- राष्ट्रवादी काँग्रेस

मुंबई |  राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर जाऊन भेट घेतली. राज यांना ईडीने नोटीस पाठवल्यानंतर विरोधी पक्षांनी सरकारवर टीका करत याचा निषेध व्यक्त केला आहे. राज ठाकरे कोणालाच भीक घालत नाहीत… आमचा त्यांना पाठिंबा, असं विद्या चव्हाण यांनी म्हटलं आहे.

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार भयंकर आहे.जो त्यांच्या विरोधात बोलतो त्यांच्या विरोधात चौकशी यंत्रणांचा ससेमिरा लावला जातो. पण आम्ही ईडी-बीडी मानत नाही आणि राज ठाकरेही मानत नाही. आमचा त्यांना पाठिंबा आहे, असं चव्हाण म्हणाल्या.

राज यांना ईडीने नोटीस पाठवल्यानंतर सगळे विरोधी पक्ष एकवटले आहेत. मोदी-शहांची हिटलरनिती आम्ही खपवून घेणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरे यांनी EVM विरोधात भूमिका घेतल्याने हे सगळं होत आहे. सरकारविरोधात कोणी गेलं की हे असंच होणार… पण आम्ही राज ठाकरे यांच्या सोबत आहोत, असं राजू शेट्टी म्हणाले आहेत.

Loading...

दरम्यान, मनसे अश्या नोटीसींना कसलीही भीक घालत नाही, असं मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले आहेत.


महत्वाच्या बातम्या-

-“भारतीय कायदा म्हणजे प्रकाश आंबेडकरांच्या बापाची जहागीर नाही”

-काँग्रेसचा ‘हात’ झिडकारून या आमदार शिवसेनेत प्रवेश करणार!

-बाहेरच्या नेतृत्वाला नगरमध्ये ‘नो एन्ट्री’; विखे-पाटलांचा रोहित पवारांना इशारा

-स्वाभिमानी कोल्हापूरकरांना कुणाची भीक नको; संभाजीराजेंनी तावडेंना सुनावलं

-“भारताच्या संविधानाला मी खेकड्याची उपमा देतो”

Loading...