“नेहरू-गांधी परिवाराशिवाय काँग्रेस चालवणं कठीण आहे”

नवी दिल्ली | नेहरु-गांधी परिवार हे काँग्रेसचे ब्रँड इक्विटी आहेत. नेहरू-गांधी परिवाराशिवाय काँग्रेस पक्ष चालवणं कठीण आहे, असं वक्तव्य काँग्रेसचे नेते अधिर रंजन चौधरी यांनी केलं आहे. गांधी-नेहरु परिवाराबाहेरील व्यक्तीकडून पक्ष चालवणं खूप कठीण आहे, असं चौधरी यांनी म्हटलं आहे.

काँग्रेससारखा मजबूत विचारधारा असलेला पक्ष, ज्याची प्रत्येक ठिकाणी पोहोच आहे, भाजपच्या जातीयवादी रथाला रोखण्याची ताकद आहे. मात्र प्रादेशिक पक्ष ज्यापद्धतीने काम करत आहेत त्यामुळे येणाऱ्या दिवसांत ते आपलं महत्व हरवून बसतील, असं चौधरी म्हणाले आहेत.

सोनिया गांधींना अध्यक्षपदाची जबाबदारी नको होती. पण राहुल गांधींच्या राजीनाम्यानंतर संघटना संकटात आल्याचं पाहता ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांच्या विनंतीनंतर त्यांनी हे पद स्वीकारलं, असं चौधरी यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, स्वातंत्र्यापूर्वीपासून काँग्रेस गांधी-नेहरु कुटुंबीयांशी संबंधित आहे. आणि इंदिरा गांधी,राजीव गांधी यांनी देशासाठी आपले जीव गमावले आहेत, असही चौधरी यांनी म्हटलं आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-“जेएनयू विद्यापीठाला मोदींचं नाव द्या, मोदींच्या नावावरही काहीतरी असावं”

-राधाकृष्ण विखे पाटील यांना मातृशोक; सिंधुताई विखेंचं वृद्धापकाळाने निधन

-लग्नसोहळ्यात आत्मघाती बॉम्बस्फोट; 40 जणांचा जागीच मृत्यू

-आता बाण हातात आहे; घड्याळ तर बंद पडलं- जयदत्त क्षीरसागर

-रावसाहेब दानवेंचा मोठा गौप्यस्फोट; म्हणतात…

Loading...