काँग्रेसला मोठा धक्का, या आमदार शिवसेनेत प्रवेश करणार!

नाशिक |  इगतपुरी त्र्यंबकेश्वरच्या काँग्रेस आमदार निर्मला गावित काँग्रेसचा हात झिडकारून आपल्या हातात शिवबंधन बांधणार आहेत. उद्या त्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, असं वृत्त ‘दै. सकाळ’ने दिलं आहे. उद्या दुपारी 4 वाजता त्या  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

निर्मला गावित अगोदर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होत्या. मात्र त्यांनी भाजपमध्ये प्रवेश न करता हातात शिवबंधन बांधण्याचं ठरवलं आहे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची महाराष्ट्रासह देशात अत्यंत दयनीय अवस्था झाली. मोदी-शहांचा विजयरथ काँग्रेस रोखू शकलं नाही. लोकसभेचा निकाल लागल्यापासून महाराष्ट्रात पक्षांतराचं जोरदार वारं वाहत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक आमदार सत्ताधारी भाजप-सेनेत प्रवेश करत आहेत.

दरम्यान, गावित यांनी जर शिवसेनेत प्रवेश केला तर तो काँग्रेसला मोठा धक्का असणार आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-बाहेरच्या नेतृत्वाला नगरमध्ये ‘नो एन्ट्री’; विखे-पाटलांचा रोहित पवारांना इशारा

-स्वाभिमानी कोल्हापूरकरांना कुणाची भीक नको; संभाजीराजेंनी तावडेंना सुनावलं

-“भारताच्या संविधानाला मी खेकड्याची उपमा देतो”

-आमच्या हातात सत्ता द्या… स्थानिकांना 75 टक्के रोजगार देतो- अजित पवार

-दोषी नसाल तर घाबरू नका… चौकशीला बिनधास्त सामोरे जा; तावडेंचा राज यांना सल्ला

Loading...