राधाकृष्ण विखे पाटील यांना मातृशोक; सिंधुताई विखेंचं वृद्धापकाळाने निधन

अहमदनगर | गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या मातोश्री सिंधूताई विखे पाटील यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आहे. आज सकाळी प्रवरा ग्रामीण रूग्णालयात त्यांची प्रणज्योत मालवली. सिंधूताई विखेंच्या निधनाने विखे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

प्रवरानगर येथील पद्मश्री बाळासाहेब विखे कारखान्याच्या डॉ. धनंजयराव गाडगीळ सभागृहासमोरील प्रांगणात दुपारी 12 वाजता त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात येणार आहे.

प्रवरेच्या विकासात सिंधूताई विखेंचा मोलाचा वाटा होता. आदर्श माता आणि आदर्श पत्नी म्हणून त्यांचं कार्य कौतुकास्पद होतं. तसेच पुणे विद्यापीठाने जीवनसाधना गौरव पुरस्कार देऊन सिंधूताई विखेंचा गौरव केला होता.

दरम्यान, सिधूताई यांच्या पश्चात जागतिक आरोग्य संघटनेचे माजी अध्यक्ष डॉ. अशोकविखे, राधाकृष्ण विखे आणि प्रवरा अभिनत विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. राजेंद्र विखे ही तीन मुले आणि दोन मुली असा परिवार आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-लग्नसोहळ्यात आत्मघाती बॉम्बस्फोट; 40 जणांचा जागीच मृत्यू

-आता बाण हातात आहे; घड्याळ तर बंद पडलं- जयदत्त क्षीरसागर

-रावसाहेब दानवेंचा मोठा गौप्यस्फोट; म्हणतात…

-गुलाम अहमद मीर यांची नजरकैद बेकायदेशीर-पी. चिदंबरम

Loading...