‘आमचं ठरलंय… जय महाराष्ट्र!’; रश्मी बागल शिवसेनेत प्रवेश करणार??

करमाळा |  लोकसभा निवडणुकीत चांगलं काम करूनही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला डावललं, अशी खंत करमाळ्याच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रश्मी बागल-कोलते यांनी व्यक्त केली आहे. त्यानंतर आता त्या शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

रश्मी बागल यांच्या कार्यकर्त्यांनी आणि त्यांच्या गटाने ‘आमचं ठरलंय… जय महाराष्ट्र’ अशा आशयाच्या ओळी फेसबुकवर टाकल्याने त्यांचा शिवसेना प्रवेश निश्चित झाला आहे, अशा चर्चा राजकीय वर्तुळात आहेत.

सोमवारी रश्मी बागल यांनी पुढील निर्णय ठरवण्यासाठी कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे.  त्या बैठकीनंतर त्या पुढील निर्णय घेणार आहेत.

दरम्यान, रश्मी बागल यांनी जर शिवसेनेत प्रवेश केला तर राष्ट्रवादीसाठी तो मोठा धक्का असणार आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-…म्हणून महाराष्ट्र युवक काँग्रेस भरवणार टिकटॉक स्पर्धा!

-प्रशिक्षकपदी पुन्हा एकदा निवड झाल्यानंतर रवी शास्त्री म्हणतात…

-महाराष्ट्रातील वृक्षलागवड हे तर थोतांड आणि नाटक आहे; सयाजी शिंदेंचा सरकारवर हल्लाबोल

-अनुष्कासोबतच्या नात्याबाबत प्रभासनं मौन सोडलं; म्हणतो…

-शिवसेना खासदार श्रीकांत शिंदेंनी पंतप्रधान मोदींना लिहिलं पत्र; म्हणतात…

Loading...