चित्रा वाघांनी पक्ष सोडला, अन् रुपाली चाकणकरांना संधी मिळाली

मुंबई | राष्ट्रवादीचे अनेक नेते पक्षाची साथ सोडत असताना महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी देखील पक्षाला रामराम केला. आता त्यांच्या जागी रुपाली चाकणकर यांची निवड करण्यात आली आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चाकणकर यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्या वंदना चव्हाण उपस्थित होत्या.

चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीचं महिला संघटन करण्याचं चांगलं काम केलं होतं. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्या बॅकफूटवर गेल्या होत्या. त्यातच त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला.

रुपाली चाकणकर यांचं शहराध्यक्षपद नुकतंच काढून घेण्यात आलं होतं, मात्र आता राष्ट्रवादीने त्यांना थेट राज्याचं महिला संघटन सांभाळण्याची आणि वाढवण्याची जबाबदारी दिली आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

एकनाथ खडसे काँग्रेसमध्ये जाणार???; ‘यानेत्याचा दावा

आत्तापर्यंत 20 जणांचा पवारांना रामराम तरहे’ 9 जण सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत!

खरं बोललो तर जीवाला धोकाराजू शेट्टी

-‘यामहत्वाच्या प्रश्नासाठी शरद पवार आणि प्रियांका गांधी पंढरपुरमध्ये एकाच मंचावर!

-‘यामाजी मुख्यमंत्र्यांचा पुतण्या धनुष्यबाण उचलण्याच्या तयारीत?

 

Loading...