सलमान खान माझ्याशी लग्न करणार आहे, या अभिनेत्रीनं केला दावा

मुंबई |  भाईजान सलमान खान लग्न कधी करणार हा प्रश्न फक्त त्याच्या घरच्यांनाच नाहीतर त्याच्या लाखो फॅन्सना सतावतो आहे. त्याच्यासोबत अनेक अभिनेत्रींची नावे देखील जोडली गेली मात्र त्यांच्या ‘त्या’ नात्याचं रूपांतर लग्नात होऊ शकलं नाही. मात्र अभिनेत्री झरीन खानने मस्करीत का होईना पण सलमान बरोबर नातं जोडलं आहे.

एका मुलाखतीत, तुझ्या अफेअर्सची जर चर्चा रंगली तर ती काय असेल? असा प्रश्न झरीनला विचारण्यात आला होता. त्यावेळी माझं नाव सलमानसोबत जोडलं जावं. आणि एक गंमतीशीर अफवा आहे ती मला ऐकायची आहे ती म्हणजे, सलमान खान माझ्याशी लग्न करणार आहे, असं मजेशीर उत्तर झरीनने दिलं आहे.

सलमानचं कतरिना कैफ बरोबरचं नातं संपुष्टात आल्यावर तो झरीनला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र त्यांच्यात तसं काही नसल्याचं काही काळाने पुढं आलं.

दरम्यान, झरीनने सलमान खानसोबत वीर चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-शरद पवार म्हणतात… कावळ्यांची चिंता करायची नाही तर मावळ्यांची चिंता करावी!

-पूरपरिस्थिती ओसरल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा उद्यापासून पुन्हा सुरू

-“महाराष्ट्राची उपराजधानी असलेलं नागपूर गुन्हेगारीचं केंद्र अन् मुख्यमंत्रीदेखील त्याच गावचे”

-लोकसभा निवडणुकांआधी काँग्रेसवासी झालेल्या शत्रुघ्न सिन्हांचा सूर बदलला; म्हणतात…

-भाजपकडे विधानसभेसाठी मी 57 जागा मागितल्या आहेत- महादेव जानकर

Loading...