छोट्या दानवेंकडे भाजपनं सोपवली ही मोठी जबाबदारी!

जालना |  केंद्रिय राज्यमंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव आमदार संतोष दानवे यांच्या खांद्यावर भाजपने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महत्वाची जबाबदारी सोपवली आहे. संतोष दानवे पाटील यांना पक्षाने जालना जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे.

विधानसभेच्या तोंडावर त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवून पक्षाने त्यांच्यावर मोठा विश्वास टाकला आहे. जालना जिल्ह्यात पक्षसंघटना बळकट करून भाजप कार्यकर्त्यांना अधिक जोमाने काम करण्याचं बळ त्यांना आता द्यावं लागणार आहे.

संतोष दानवे जालन्यातल्या भोकरदन-जाफ्राबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. यातच आता विधानसभेला त्यांना त्यांच्या मतदारसंघात स्वत:चा प्रचार आणि जालना जिल्हाध्यक्ष म्हणून जालना जिल्ह्यात इतर भाजप उमेदवारांचा प्रचार करावा लागणार आहे.

दरम्यान, पक्षनेतृत्वाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल संतोष दानवे यांनी आभार मानले आहेत. तसेच दाखवलेला विश्वास आपण खरा करून दाखवू, असा विश्वास व्यक्त केला आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-मनसे नेते अनिल शिदोरेंचा फडणवीस सरकारवर गंभीर आरोप, म्हणतात..

-“देवांचा राजा इंद्र; महाराष्ट्राचा राजा देवेंद्र”

-‘आघाडी-बिघाडी’ बंद करा; राष्ट्रवादीच्या नेत्यांचं पोलीस आयुक्तांना निवेदन

-चूक नसेल तर घाबरण्याचं कारण नाही… मात्र चूक नसेल तर भोगावं लागेल- देवेंद्र फडणवीस

-वादग्रस्त ट्वीटनंतर शेहला रशीद यांच्या अटकेची मागणी

Loading...