कावळ्यांची चिंता करायची नसते, मावळ्यांची चिंता करा- शरद पवार

मुंबई |  गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीला अनेक नेत्यांनी रामराम ठोकला आणि सत्ताधारी भाजप-शिवसेनेत प्रवेश केला. आताही भाजप शिवसेनेचे नेते राष्ट्रवादीचे आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा करत आहेत. यावरच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपलं रोखठोक मत मांडलं आहे.

गेलेल्यांची चिंता करायची नाही. कावळ्यांची चिंता कुठे करायची असती का?? नेहमी मावळ्यांची चिंता करावी, असं वक्तव्य पवार यांनी केलं आहे.

आज अनेक लोक पक्ष सोडत आहे. मात्र जे लोक खटल्यात आहेत त्यांच्यावर राज्यकर्ते दबाव आणत आहे त्यामुळे पक्षगळती होत आहे. आपण पूर्ण स्वच्छ आहात तर आपल्याला कसलीच चिंता नाही, असं पवारांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगितलं.

दरम्यान, संकटाच्या काळात जो उभा राहतो त्याला लोक विसरत नाही, असंही पवार म्हणाले.

Loading...


महत्वाच्या बातम्या-

-पूरपरिस्थिती ओसरल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा उद्यापासून पुन्हा सुरू

-“महाराष्ट्राची उपराजधानी असलेलं नागपूर गुन्हेगारीचं केंद्र अन् मुख्यमंत्रीदेखील त्याच गावचे”

-लोकसभा निवडणुकांआधी काँग्रेसवासी झालेल्या शत्रुघ्न सिन्हांचा सूर बदलला; म्हणतात…

-भाजपकडे विधानसभेसाठी मी 57 जागा मागितल्या आहेत- महादेव जानकर

-“मोहन भागवतांना जेलमध्ये टाकतो; फक्त माझ्या हातात सत्ता द्या”

Loading...