“राज्याची उपराजधानी नागपूर गुन्हेगारीचं केंद्र अन् मुख्यमंत्रीदेखील त्याच गावचे”

मुंबई | राष्ट्रवादी महिला काँग्रेसची आज एक महत्वपूर्ण बैठक पार पाडली. बैठकीत महाराष्ट्रात महिलांवर होत असलेल्या अत्याचारासंदर्भात चर्चा झाली. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्राची उपराजधानी असलेलं नागपूर गुन्हेगारीचं केंद्र बनत आहे. अन् महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीदेखील त्याच गावचे आहेत, असा निशाणा पवारांनी मुख्यमंत्र्यांवर साधला आहे.

महिलांवरील अत्याचार आणि विकृत मनस्थितीवर जरब बसण्याची यंत्रणा ढिसाळ झाली आहे. राज्यकर्ते महिलांना सन्मानाने वागणूक देत नाहीत ते यंत्रणा काय चालवणार?? मात्र या साऱ्यांविरोधी आवाज उठवण्याचा निर्धार राष्ट्रवादीच्या महिलांमध्ये आहे, असं पवार म्हणाले.

देश चहूबाजूंनी संकटात आहे. आपला पक्ष हा विकासासोबत अन्यायावर मात करणारा पक्ष आहे. यासाठी संघटन मजबूत करणं गरजेचे आहे, असंही पवार यावेळी म्हणाले.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-लोकसभा निवडणुकांआधी काँग्रेसवासी झालेल्या शत्रुघ्न सिन्हांचा सूर बदलला; म्हणतात…

-भाजपकडे विधानसभेसाठी मी 57 जागा मागितल्या आहेत- महादेव जानकर

-“मोहन भागवतांना जेलमध्ये टाकतो; फक्त माझ्या हातात सत्ता द्या”

-जितेंद्र आव्हाड यांची राहुल गांधींना ‘ही’ कळकळीची विनंती…

अभिनेते सयाजी शिंदे यांच्या टीकेला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं रोखठोक प्रत्युत्तर!

Loading...