अखेर कलबुर्गींच्या मारेकऱ्यांची ओळख पटली

नवी दिल्ली | जेष्ठ विचारवंत डाॅ. एम. एम. कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांची ओळख पटली असल्याचं एसआयटीच्या तपासात समोर आलं आहे. एसआयटीच्या तपासाला मोठं यश आलं आहे. कलबुर्गींच्या पत्नी उमादेवींनी मारेकरांना ओळखलं आहे.

गणेश मिस्कीनने कलबुर्गींवर गोळ्या झाडल्या तर प्रविणप्रकाश चतुर हा दुचाकी चालवत असल्याचं तपासात समोर आलं आहे. तसा ठोस पुरावा मिळाला आहे. अजून कुठल्या संघटनांचा या हत्येशी संबंध आहे का? एसआयटीच्या तपासात आणखी काय समोर येतं, हे पहावं लागेल.

दाभोळकर, पानसरे, गौरी लंकेश पाठोपाठ 30 ऑगस्ट 2015 ला धारवाडमधल्या कल्याणनगरमध्ये गोळया झाडून हत्या करण्यात आली होती.

दरम्यान, गौरी लंकेश हत्या प्रकरणातल्या आरोपींचा कलबुर्गींच्या हत्येशी संबंध असल्याचंही तपासात समोर आलं आहे.

Loading...

महत्त्वाच्या बातम्या-

-हिमाची ‘सुवर्ण धाव’; एकाच महिन्यात पटकवली 5 सुवर्ण पदकं

-जे.पी. नड्डा यांचा पहिलाच मुंबई दौरा, पण टाळली उद्धव ठाकरेंची भेट

-लोकप्रतिनिधींबद्दल गैरसमज पसरवणं थांबवा; ‘दादां’चा ‘दादां’ना सल्ला

-बंदूूक घेऊन नाचणाऱ्या भाजप आमदाराला बिग बॉसचं निमंत्रण!

-खासदार अमोल कोल्हेंचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणतात…

Loading...