भाजपप्रवेशाच्या चर्चांवर विश्वजीत कदम यांचा मोठा खुलासा…!

नवी दिल्ली | पतंगराव कदम साहेबांनी 40 वर्ष काँग्रेसमध्ये काढली. यापुढेही मी काँग्रेस पक्षाचा विचार घेऊन महाराष्ट्रात काम करणार असून याबद्दल कोणाला शंका असण्याचं कारण नाही, असं महाराष्ट्र काँग्रेस कार्याध्यक्ष विश्वजीत कदम यांनी म्हटलं आहे.

काँग्रेसच्या पाच कार्याध्यक्षांपैकी एक भाजपमध्ये आला तर कोणाला आश्चर्य वाटायला नको, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी काँग्रेसला लगावला होता. यालाच विश्वजीत कदम यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

चंद्रकांत पाटील वरिष्ठ मंत्री आहेत. त्यांनी असं हास्यास्पद वक्तव्य का करावं? असं कदम यांनी म्हटलं आहे.

चंद्रकांतदादांनी वारंवार त्यांची इच्छा अप्रत्यक्षपणे व्यक्त केली आहे. पण मी माझी भूमिका यापूर्वीही स्पष्ट केली आहे, असं विश्वजीत कदम यांनी सांगितलं आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-“शिवसेनेकडे सत्ता आल्यास मुख्यमंत्री आदित्य ठाकरेच!”

-“काँग्रेसच्या पाच कार्याध्यक्षांपैकी एक भाजपमध्ये आला तर कोणाला आश्चर्य वाटायला नको”

-मोदीजी तुमचे खूप खूप आभार…; कुलभूषण जाधव केसप्रकरणी सुषमा स्वराज यांना अत्यानंद

-कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती; आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा मोठा निर्णय

-…म्हणून अरविंद केजरीवाल यांनी केलं मुख्यमंत्री फडणवीसांचं कौतुक!

Loading...