…म्हणून महाराष्ट्र युवक काँग्रेस भरवणार टिकटॉक स्पर्धा!

मुंबई | विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र युवक काँग्रेसने तरूणांना काँग्रेस पक्षाकडे आकर्षित करण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे. युवक काँग्रेसने ‘वेक अप महाराष्ट्र टिक टॉक स्पर्धे’चं आयोजन केलं आहे.

नव्या महाराष्ट्रासाठी आपल्या मनातील नाविण्यापूर्ण कल्पना किंवा तुमचं मतं मांडण्यासाठी टीकटॉकवर व्हीडिओ बनवण्याचं आवाहन युवक काँग्रेसने केलं आहे. माझा दमदार व्हिडिओ तुफान बोलेल, नवीन महाराष्ट्र निर्माण करेल…. अशा आशयाचं कॅप्शन देऊन त्यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं आहे.

युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे नवनव्या कल्पना आणि शक्कल लढवून त्या जनतेसमोर ठेवत असतात. त्यांच्या संपर्कात राहत असतात. यावेळी सुद्धा त्यांचा हाच प्रयत्न असल्याचं बोललं जातंय.

दरम्यान, महाराष्ट्रातील तरूण ‘युवक काँग्रेस’च्या आवाहनाला कशा प्रकारे प्रतिसाद देतात, हे पाहणे महत्वाचे ठरेल.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-प्रशिक्षकपदी पुन्हा एकदा निवड झाल्यानंतर रवी शास्त्री म्हणतात…

-महाराष्ट्रातील वृक्षलागवड हे तर थोतांड आणि नाटक आहे; सयाजी शिंदेंचा सरकारवर हल्लाबोल

-अनुष्कासोबतच्या नात्याबाबत प्रभासनं मौन सोडलं; म्हणतो…

-शिवसेना खासदार श्रीकांत शिंदेंनी पंतप्रधान मोदींना लिहिलं पत्र; म्हणतात…

“राहुल-प्रियांका यांनी रक्षाबंधन साजरा केलेला फोटो दाखवा आणि बक्षिस घेऊन जा!”

Loading...